भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव

tujhe potin thav | vhava aisa majha bhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥१॥ करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥ अहंकार खोटे । वाटे श्वापदांची थाटे ॥२॥ तुका म्हणे आई । हातीं धरूनि संग देई ॥३॥