भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें

sukh pahatan javapaden | duhkh parvata evadhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥१॥ धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥ नेलें रात्रीनें तें अर्धें । बाळपण जराव्याधें ॥२॥ तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥३॥