भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगलें

sukhachen otalen | dise shrimukh changalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगलें ॥१॥ मनेंधरिला अभिळास । मिठी घातली पायांस ॥ध्रु.॥ होतां दृष्टादृष्टी । तापगेला उठाउठी ॥२॥ तुका म्हणे जाला । लाभें लाभ दुणावला ॥३॥