भजनी मालिका
← भजनांकडे परत

सीण भाग हरे तेथींच्या निरोपें । देखिलिया रूप उरी नुरे

sin bhag hare tethinchya niropen | dekhiliya rup uri nure

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सीण भाग हरे तेथींच्या निरोपें । देखिलिया रूप उरी नुरे ॥१॥ इंद्रियांची धांव होईल कुंटित । पावेल हें चित्त समाधान॥ध्रु.॥ माहेर आहेसें लौकिकीं कळावें । निढळ बरवें शोभा नेदी ॥२॥ आस नाहीं परी उरी बरी वाटे । आपलें तें भेटे आपणासी ॥३॥ तुका म्हणे माझी अविट आवडी । खंडण तांतडी होऊं नेदीं ॥४॥