भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखवाटे ये चि ठायी । बहु पायीं संतांचें

sukhavate ye chi thayi | bahu payin santanchen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुखवाटे ये चि ठायी । बहु पायीं संतांचें ॥१॥ म्हणऊनि केला वास । नाहीं नास ते ठायीं ॥ध्रु.॥ न करवे हाली चाली । निवारिली चिंता हे ॥२॥ तुका म्हणे निवे तनु । रज:कणु लागती ॥३॥