भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे

siddha karuniyan thevilen kandan | maj sangatin shuddha buddhi ge

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥ आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥ सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुजमिळणी जीवे मिळे ॥२॥ एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥३॥ सरलें कांडण पाकसद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचें ॥४॥ उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥५॥ तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनि तांतडी मूळ केलें ॥६॥