भजनी मालिका
संत सेना

संत सेना

या संतांची भजने

वासुदेव टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा ॥१॥ रामकृष्ण वासुदेवा। जाणवितो सकल जिवा। द्या मज दान वासुदेवा। मागुता फेरा नाहीं या गांवा गा ॥२॥

रचनाकार: संत सेना

विटेवरी उभा नीट कटावरी कर । वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये ॥१॥ श्रीमुकुट रत्नाचा ढाळ देती कुंडलांचा । तुरा खोंविला मोत्याचा तो गे माय ॥२॥

रचनाकार: संत सेना

विटेवरी उभा नीट देखिलागे माये । निवाली कांती हरपला देहभाव ॥१॥ तें रूप पाहतां मन माझें वेधले । नुठेचि कांहीं केलें तेथुनि गे माये ॥२॥

रचनाकार: संत सेना

वैकुंठवासिनी कृपावंत माउली। जगा तारावया अळंकापुरा आली ॥१॥ शिव तो निवृत्ति आदिमाया मुक्ताई। ब्रह्मा तो सोपान विष्णु ज्ञानदेव पाहीं ॥२॥

रचनाकार: संत सेना

शरणागत आहे वैभवाचा धनी। सत्य भावें मानी अर्पिले तें ॥१ ॥ आपणा वेगळें नेदी उरो कांहीं। भावेंचि दावी आपणामाजी ॥२॥

रचनाकार: संत सेना

श्रीज्ञानराजें केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला ॥१॥ विटेवरी उभा वैकुंठनायक। आणि पुंडलिक चंद्रभागा ॥२॥

रचनाकार: संत सेना

संतसंगतीने थोर लाभ झाला। मोह निरसला मायादिक ॥ १॥ घातले बाहेरा काम क्रोध वैरी । बैसला अंतरी पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत सेना

सिद्ध ब्रह्मज्ञान बोलतां नोहे वाचें । शांतवन क्रोधाचें झालें नाहीं ॥१॥ पाल्हाळ लटिका करणें तो काय । शरण पंढरीराया गेला नाहीं ॥२॥

रचनाकार: संत सेना