भजनी मालिका
संत सेना

संत सेना

या संतांची भजने

येउनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर । तयाचा संसार सुफळ झालागे माये ॥१॥ प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी । तारिलें जगासी नाममात्रें ॥ २॥

रचनाकार: संत सेना

येऊनि गर्भासी मेलों उपवासीं । नाहीं सखी ऐसी भेटली कोणी ॥१॥ देह जाणे अनित्य करावें स्वहित । मोहापासुनि निश्चित सोडवील ॥२॥

रचनाकार: संत सेना

योगियाचा राजा कैलासवासी गे माये। गाती नारद तुंबर पुढे बसवा आहे ॥१॥ गळां रुंडमाळा वासुकीचें भूषण । गजचर्म पांघुरला। अंगी भस्माचें लेपन ॥२॥

रचनाकार: संत सेना

लेकुराची आळी मायबापापुढें। पुरवी लाडे कोडे लळे त्याचें ॥१॥ करावा सांभाळ सर्वस्वी गा आतां । कांहो अव्हेरितां जवळीचा ॥२॥

रचनाकार: संत सेना

वाचे उच्चारी जो ज्ञानदेवाशी । तयाच्या सुकृतासी नाहीं पार ॥१॥ पूर्वीचे सुकृत फळासि आलें। वाचें उच्चारिलें ज्ञानदेवा ॥२॥

रचनाकार: संत सेना