भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिद्ध ब्रह्मज्ञान बोलतां नोहे वाचें । शांतवन क्रोधाचें झालें नाहीं

siddha brahmadnyan bolatan nohe vachen | shantavan krodhachen jhalen nahin

रचनाकार: संत सेना · अभंग
सिद्ध ब्रह्मज्ञान बोलतां नोहे वाचें । शांतवन क्रोधाचें झालें नाहीं ॥१॥ पाल्हाळ लटिका करणें तो काय । शरण पंढरीराया गेला नाहीं ॥२॥ जंव नाहीं गेली अज्ञानाची भ्रांती। जंव नाहीं विरक्ती बाणली आंगीं ॥३॥ जीवाची तळमळ राहिली सकळ। मग ब्रह्मज्ञान कळे सेना म्हणे ॥४॥