भजनी मालिका
← भजनांकडे परत

विष्णूचा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर

vishnucha avatar| sakha majha dnyaneshvar

रचनाकार: संत सेना · अभंग
विष्णूचा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥ चला जाऊं अळंकापुरा। संतजनाच्या माहेरा ॥२॥ स्नान करितां इंद्रायणी। मुक्तां लागती चरणीं ॥३॥ ज्ञानेश्वराच्या चरणीं । सेना आला लोटांगणीं ॥४॥