भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाट धरितां पंढरीची। चिंता हारे संसाराची

vat dharitan pandharichi| chinta hare sansarachi

रचनाकार: संत सेना · अभंग
वाट धरितां पंढरीची। चिंता हारे संसाराची ॥ १॥ ऐसे कोठें नसे पायीं। धुंडितां ब्रह्मांड पाही ॥२॥ पाहिली शोधूनीं । तीर्थे आणि देवस्थानी ॥३॥ मोक्ष मुक्ती पाही। सेना म्हणे लागा पायीं ॥४॥