भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिद्धांमाजी अग्रगणी । तो हा भोळा शुळपाणी

siddhammaji agragani | to ha bhola shulapani

रचनाकार: संत सेना · अभंग
सिद्धांमाजी अग्रगणी । तो हा भोळा शुळपाणी॥ १॥ धन्य धन्य त्रिंबक राजा। तया नमस्कार माझा ॥२॥ जटी गंगा वाहे। तो हा त्रिगुणात्मक पाहे ॥३॥ भोंवता वेढा ब्रह्मगिरी। मध्यें शोभे त्रिपुरारी ॥४॥ सेना घाली लोटांगण । उभाहर के जोडुन ॥५॥ १६. धन्य धन्य निवृत्तिराया । शरण आले तुझियां पायां॥१॥ नको पाहूं दुसरें आतां। गुण दोषाची वार्ता ॥२॥ नाहीं माझा अधिकार । यातीहीन मी पामर ॥३॥ अपराधाचा केलों। सेना म्हणे काय बोलो ॥४॥