भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

सद्गुरुकृपा वोळली तयां । जे पंढरीराया अनुसरले ॥१॥ भक्ति ज्ञान वैराग्यशीळ । शांति अढळ निवैंरता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सनकादिक म्हणती देवा । भुललेति भावा भक्तांच्या ॥१॥ तरी जे येथें दर्शना येती । दयावी त्यां मुक्ति सायुज्यता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सप्त अहोरात्र होतां । तेथें कृष्ण जळाअतोंता । सांगतां युध्दाची ते वार्ता । सर्पी विखारीं वेष्टिला ॥१॥ बोलिला उदंड विरुध्द वचनें । युध्दहि केलें अति सत्राणें । परी या त्रैलोक्यजीवनें । लाविली दोरी तया नाकीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सभें कंस सिंहासनीं । बैसल्याचि आश्चर्य देखिलें नयनीं । गेले चकपक अंगीचे निघोनी । संचारला मनीं श्रीकृष्णा ॥१॥ राव भयाचिये भक्ती । कृष्णाचि देखे सकळां भूतीं । आपआपणसीही अंतीं । कृष्णरुपेंचि देखतु ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

समान नीट दोही आंगे पोरा खेळे मुरदांगे । नाहीं तरी जासि वायां चुकवितां आंगें ॥१॥ खेळ सख्या खेळा । लक्षूनि हरी डोळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सये आनंदाचा अवचिता आला पुर । याचे मुरलीचर उठितांचि गजर । मी मज नाठवेचि कैचें घरदार । ठेलें तटस्थचि राहिलें शरीर वो ॥१॥ ऐसे मोहन नाटक येणें केलें । जीव चैतन्य वो हरुनि नेलें । एकलें एकवटचि करुनी ठेविलें । नाठवें सासुरें ना माहेर ऐसें झालें वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सरलियां खेळा गे म्हणती अवघ्या बाळा । आरते आरती करुं नंदाच्या गोवळा ॥१॥ हाचि जीव प्राण सोयरा सज्जन । ओवाळितां यासि बाई निवे तनुमन ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सर्पे मुखींच धरिलें विष । मानुनि पीयूष अत्यादरें ॥१॥ आणिका डंखुनी वधवी प्राणा । तैसी त्या दुर्जना चाहाडी गोड ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सर्व काळ तुमच्या पदीं । मोक्ष मुक्ति रिध्दिसिध्दी ॥१॥ करिती भक्ताचे पाळण । जे जे ध्याती ह्रदयीं चरण ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सर्वगुणीं गुणमंडिता । सर्वरुपीं रुपशोभिता । सर्वी सर्व तूं अनंता । यश वागवितां निज कीर्ति ॥१॥ ऐसी असोनियां शक्ति । दवडतां कां माझी आतीं । चरण पहावया चित्तीं । वर्ते चिंता अनिवार ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सर्वज्ञ सर्वदा तुम्ही सर्वसाक्षी । म्हणऊनि कैपक्षी हरिभक्तांचे ॥१॥ खरें खोटें कळे तुम्हां वरीवरीं । संकल्प अंतरीं उठितांचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा