भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

शुक प्रल्हाद हरिच्या नामें । गातां सुखसंभ्रमें निवाले ॥१॥ त्यांनी उघडूनियां हे मागी । दाविली जगीं हरिभक्ती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

शुकादिकाचिये ह्रदयीं ध्यान । आम्हां जोडलें वो न करितां साधन । सहजचि पाचारितां येतसे धांवोन । प्रेमें आलिंगितां निवें तनु मन वो ॥१॥ ऐशा गौळणी आनंद भरितां । दृष्टीं अवलोकूनि मदनचिया ताता । म्हणती धन्या भाग्य आमुचें वो आतां । लाधलों जन्म झाली कृताचि कृत्यता वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

शुध्द सात्विकी ब्राम्हण । सत्वरजमिश्रित क्षत्रिय जाण् ॥१॥ रजतमें वैश्य निर्माण । शूद्रा तमो निर्मिता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

शृंगें पसरिले जैसे शूळ । नेत्रींहूनि निघती ज्वाळ । श्वास रंध्रीं धूमकल्लोळ । डरकिया अंतराळ दुमदुमितो ॥१॥ मागें सरे पुढे धांवे । आडवाचि उडे उंच उंचावे । ऐशीं दावूनियां लाघवें । हरिसन्निध पातला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

शोधूनी अन्वये वंशवंशावळी । परंपरा कुळीं उच्चारण ॥१॥ म्हणविले पूर्वी जैसे होते तैसे । केले सामरस्यें समाधान ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

श्रवणीं कुंडलें ढाळ देती । हीरयापगंति दंत तैसे ॥१॥ तुळसि वैजयंती माळा । पदकि कीळा रत्न ज्योति ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

श्रीकृष्ण विचरे कुंजवनीं । तैसाचि दंडकरण्यीं श्रीराम ॥१॥ एकें वधिले खरदूषण । एकें मर्दन कागबगा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

श्रीकृष्ण सांडूनि जातांचि दुरी । वसुदेवातें दैन्‍य अवदसा वरी । मग देवकीजवळी देतां ते कुमरी । महाआक्रोशें गर्जिन्नली ॥१॥ ऐकूनि कंस भयचकित । असुरसैन्यक भयें कांपत । सेवक धांवोनि रायते म्हणत । जन्मला सुत देवकिये ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

श्रीहरिच्या संकीर्तनें । तुटलीं बंधनें बहुतांची ॥१॥ होऊनियां उपरती । राजा परीक्षिती उध्दरला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

श्रुतीदेवाच्या कणिया खाणें । श्रलाध्य अन्नें विदुराच्या ॥१॥ द्रौपदीहातींचे भाजीपान । मानी समान पंचामृता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सकळ मंत्रां वरिष्ठ सार । विठ्ठल नाम त्रि अक्षर ॥१॥ वाचे उच्चार करितां जप । प्रगटे देहीं विठ्ठल रुप ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सकळ मंत्रांमाजी मंत्र उत्तम । दोंनीं अक्षरें जगतां राम । निरसोनियां मायादि भ्रम । पाविजे निजधाम अनायसें ॥१॥ तैसाचि मंत्राराज प्रसिध्द । त्रि अक्षरीं जपतां गोविंद । नरनारी बाळकें शुध्द । पावती अच्युतपदातें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सकळ साधनां वरिष्ठ सार । विठ्ठल नामाचा उच्चार । आणखी नका वोरबार । शीणचि उरेल पुढती ॥१॥ धांवा म्हणोनि अवघे वेगीं । चितचि ठेवा पांडुरंगी । संसारचि तुटेल मागी । फिटेल धगी त्रिविध तापा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा