भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वकाळ जागवीन । आळवीन सुस्वरें

sarvakal jagavin | alavin susvaren

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सर्वकाळ जागवीन । आळवीन सुस्वरें ॥१॥ नामें तुमचीं अहो देवा । श्रीमाधवा गोविंदा ॥२॥ करीन हेचि दास्य कोडें । कीर्तन पुढें आवडी ॥३॥ निळा म्हणे येईल मना । दया हो वरदाना तेव्हां मज ॥४॥