भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

सर्वांमाजी गगन आहे । परि धरितांचि नये काय करुं ॥१॥ तैसें नाकळेचि तें शंब्दातें । जेविं खदयोतें रवीभेटी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सर्वी असतां सर्वपणें । मी हें म्हणे अविदया गुणें ॥१॥ पाहातां आधीं अविदया‍चि वावो । तेथें मीपणाचा कैंचा ठावो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

संवर्तक वर्षेल जळधारीं । तुवांहि झगटावें तंव त्यावरी ऐसें सांगोनियां प्रेरिले वरी । पांचहिजण अतिक्रोधें ॥१॥ आज्ञा होतांचि चालिले मेघ । पवन त्याही पुढें सवेग । तेणें अभ्रें दाटली अनेक । पाडिला अंधकार गोकुळावरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सहजचि घरींहूनियां यावें । विठठला पहावें रुक्मिणी ॥१॥ न लभेचि जो कां ब्रम्हादिकां । तो या लोकां दाखविला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सहजचि तुमचीं वंदिली पाऊलें । तवं मी माझें हें हिरोनि घेतलें ॥१॥ आतां कोण दर्शना येईल सांगा । स्वभाव कळल्यावरी तुमचा पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सांगतां आतां न वाटे खरें । भोगितां बरें जाणवेल ॥१॥ तेव्हां कोणी न ये कामा । हिरोनी श्रमा घ्यावया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सांगतां महिमा पंढरीचा । अपार वाचा वेदांचिये ॥१॥ सहजचि क्षेत्रा जाईन म्हणतां । धांवे सायुज्यता सामोरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सांगावें उगउनी न कळे तयासी । तुम्ही तो मानसीं साक्ष माझें ॥१॥ विश्वाचे व्यापक चाळक चित्ताचें । साक्षी अंतरींचें जेथें तेथें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सांगितलें वर्म एवढेंचि करीं । नित्यता उच्चारीं हरिचें नाम ॥१॥ न लगे कोटें जाणें येणें । कर्मबंधनें तुटतील ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सांगेन तें हित धरा अवघें मनीं । नका मन कोणी वीट याचा ॥१॥ बरें शिकवितां बरें तें माना वाईटा त्यागावें त्यागवितां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सांगेल खूण परि हें न कळे । नुघडतां डोळे बुध्दीचे ॥१॥ याचिलागीं चित्तशुध्दी । करा हो उपाधी निरसुनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा