भजनी मालिका
← भजनांकडे परत

सरलियां खेळा गे म्हणती अवघ्या बाळा । आरते आरती करुं नंदाच्या गोवळा

saraliyan khela ge mhanati avaghya bala | arate arati karun nandachya govala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सरलियां खेळा गे म्हणती अवघ्या बाळा । आरते आरती करुं नंदाच्या गोवळा ॥१॥ हाचि जीव प्राण सोयरा सज्जन । ओवाळितां यासि बाई निवे तनुमन ॥२॥ करुनियां आरतीं पंचप्राण ज्योती । मिळोनियां सकळां बाळा श्रीमुख पाहाती ॥३॥ निळा म्हणे वेगळे धन्य पर्वकाळ । साधला हा आजि येथें आळवूं गोपाळ ॥४॥