भजनी मालिका
← भजनांकडे परत

सप्त अहोरात्र होतां । तेथें कृष्ण जळाअतोंता । सांगतां युध्दाची ते वार्ता । सर्पी विखारीं वेष्टिला

sapta ahoratra hotan | tethen krushna jalaatonta | sangatan yudhdachi te varta | sarpi vikharin veshtila

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सप्त अहोरात्र होतां । तेथें कृष्ण जळाअतोंता । सांगतां युध्दाची ते वार्ता । सर्पी विखारीं वेष्टिला ॥१॥ बोलिला उदंड विरुध्द वचनें । युध्दहि केलें अति सत्राणें । परी या त्रैलोक्यजीवनें । लाविली दोरी तया नाकीं ॥२॥ मग धरुनियां तें करीं । केलें नृत्य पृष्ठीवरी । सवेंचि आणिला बाहेरी । आपण वरी बैसोनियां ॥३॥ देखोनियां अवघे गडी । हर्षें नाचती बागडी । घेऊनियां गोकुळां गुढी । जाणविली वार्ता सकळांसीं ॥४॥ ऐकतां हर्षले नागरिक । सामोरे आले ते सकळिक । देखोनियां यदुनायक । लोटांगणें घालिती ॥५॥ देऊनियां आंलिगणे । कृष्णें हरिला त्यांचा शीण । मग समागमें अवघे जण आले । कृष्णमंदिरां ॥६॥ गाई वत्सां आणि गोवळां । आनंद नरनारी बाळां । झाला ब्रम्हानंद सकळां । म्हणे निळा म्हणे हरिभेटी ॥७॥