भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

सांगो जातां शब्दचि विरे । जेंवि अंधारें रविभेटीं ॥१॥ सागरीं ठाव बुडीही देतां । न लभेची सर्वथा निर्बुजला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सांगो नवरसलक्षण । तरी शृंगार हास्य करुण । धीर वीर भयानक जाण । बीभत्स अदभुत शांतरस ॥१॥ शृंगारिक तें माधुर्य गाणें । हास्य तें विनोदकरणें । कारुण्‍य तें कींव भाकणें । धैर्य उपजवणें तें धीर ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सांभाळिलें बहुता ऐकिली प्रशंसा । तुम्ही जगदाधीशा युगायुगीं ॥१॥ म्हणऊनियां आशे लागलों नेणता । बुडवूनि थितां संवसार ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सारुनी अवघींच मतांतरें । जे लटिक्यासी खरें मानिती ॥१॥ एकचि दृढाविती भावो । जेणें देवो जोडे तो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा