भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वकाळ तेंचि वाटे । रुप पहावें गोमटें

sarvakal tenchi vate | rup pahaven gomaten

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सर्वकाळ तेंचि वाटे । रुप पहावें गोमटें ॥१॥ जें कां पुंडलिकाचे व्दारी । उभें ठेलें विटेवरी ॥२॥ पितांबराचें परीधान । मुगुट कुंडले विराजमान ॥३॥ निळा म्हणे कौस्तुभ गळां । नाना पुष्पें तुळसीमाळा ॥४॥