भजनी मालिका
← भजनांकडे परत

सभें कंस सिंहासनीं । बैसल्याचि आश्चर्य देखिलें नयनीं । गेले चकपक अंगीचे निघोनी । संचारला मनीं श्रीकृष्णा

sabhen kans sinhasanin | baisalyachi ashcharya dekhilen nayanin | gele chakapak angiche nighoni | sancharala manin shrikrushna

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सभें कंस सिंहासनीं । बैसल्याचि आश्चर्य देखिलें नयनीं । गेले चकपक अंगीचे निघोनी । संचारला मनीं श्रीकृष्णा ॥१॥ राव भयाचिये भक्ती । कृष्णाचि देखे सकळां भूतीं । आपआपणसीही अंतीं । कृष्णरुपेंचि देखतु ॥२॥ जें जें देखे चाखे ऐके । तें तें कृष्णाचिया रुपें एके । ऐसा वेधोनियां निष्ठकें । ठेला निजसुखें निजकृष्णीं ॥३॥ सैन्य संपदा घरें दारें । स्त्रिया आदि करुनियां लेकुंरे । कृष्णवांचूनियां दुसरें । नाढळेचि जागृती निद्रे स्वप्रांत ॥४॥ कृष्णदेव आले जवळीं । हेंही नेणे तो ते काळीं । कृष्णावलोकनीं हें नव्हाळीं । लाधली भये आणि व्देषें ॥५॥ कृष्णचि त्या आसनीं शयनीं । कृष्ण भोजनी त्या प्राशनीं । कृष्णासी देखे जनीं वनीं । घेतला वेष्टुनी कृष्णरुपें ॥६॥ कृष्णावांचुनी नुरेचि कांहिं । जिवी मनीं बुध्दी देहीं । कृष्णचि होऊनियां लवलाही । कृष्णामाजीं मिसळला ॥७॥ कृष्णीमाजीं मिसळला ॥७ कृष्णीं कृष्ण तदाकार । होऊनियां राजा कंसासुर । पावला विश्रांतीचें घर । योगी साचार न लाहती जें ॥८॥ निळा म्हणे निजात्मत्योती । कंसाह्रदयीं जे बहु काळ होती । ते कृष्णें शोषूनियां निगुती । ठेविला आपुलिया निजह्रदयीं ॥९॥