भजनी मालिका
← भजनांकडे परत

सये आनंदाचा अवचिता आला पुर । याचे मुरलीचर उठितांचि गजर । मी मज नाठवेचि कैचें घरदार । ठेलें तटस्थचि राहिलें शरीर वो

saye anandacha avachita ala pur | yache muralichar uthitanchi gajar | mi maj nathavechi kaichen gharadar | thelen tatasthachi rahilen sharir vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सये आनंदाचा अवचिता आला पुर । याचे मुरलीचर उठितांचि गजर । मी मज नाठवेचि कैचें घरदार । ठेलें तटस्थचि राहिलें शरीर वो ॥१॥ ऐसे मोहन नाटक येणें केलें । जीव चैतन्य वो हरुनि नेलें । एकलें एकवटचि करुनी ठेविलें । नाठवें सासुरें ना माहेर ऐसें झालें वो ॥२॥ याचा नवलाहो हाचि एक वाटे । जीवीं जीव नुरे आनंदचि भेटे । तेणें सुखानंदें संसारचि आटे । मी हें माझें तों न दिसेचि कोठें वो ॥३॥ मनीं मानसीहि नुरोनिया थार । हदयभुवनीं होय याचाचि प्रसार । बुध्दी चाकाटली राहे निरंतर । सुखीं सुखाचाचि होतसे आदर वो ॥४॥ होतें आपुलीये घरीं हो निश्चळ । कोठें पाहें गेलें याचा निज खेळ । तैंचि पासूनि वृत्ति झालीं वो वोढाळ । मनीं नाठवेचि लेंकरुं ना बाळ वो ॥५॥ एका एकीची पडियेला फासा । याचा नेणोनियां स्वभाव वो ऐसा । माझा मजचि हा नवलावो मानसा । निळा म्हणे होता संचिताचा ठसा वो ॥६॥