भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

रात्री पळे येतांचि सविता । सिंहगर्जनें कुंजर चळता ॥१॥ तैसें हरिभक्तां सांकडें । येताचि पळे दृष्टीपुढें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रानीं वनीं घरीं दारीं । वसतां उच्चारीं हरिनाम ॥१॥ तेणेंचि माया उत्तरोनि घांट । पावसी वैकुंठ सहजवृत्ती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

राया जाणविती सेवक । अक्रूरें आणिला नंदबाळक । तेणं मर्दुनी बळिया रजक । धनुर्यागही भंगिला ॥१॥ आतां येऊनियां चौबारी । उभा रंगशिळेवरी । अवघ्या पाहाती नगरनारी । लोकपरिवारीं मिळोली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

राहेन आतां तुमच्या संगें । हेंचि मागें भक्तांसी ॥१॥ हेंचि दया आतां उदारपणें । माझें करणें रुप नांव ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

राहो ध्यानीं मनीं हेंचि नित्य रुपडें । जे कां वाडेंकोडे आलें पुंडलिका भेटी ॥१॥ ठेवूनियां विटे दोन्ही चरण सुकुमार । विराजले कर सुंदर कटिप्रदेशीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रुप देखतांचि लोचनीं । राहिलें तें ध्यानीं मनीं ॥१॥ माझिया जिवाचें जीवन । विठ्ठल नामाचें मोहन ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रुप विक्राळ भयानक । चुंचु वाढिलें अधिकाधिक् । पक्ष पसरोनियां अधोमुख । रक्तवर्ण व्दिनेत्र ॥१॥ क्रोधें झगडतां कृष्ण शरीरीं । येरें पक्ष धरिलें करीं । उपटूनियां सांडी पृथ्वीवरी । आपार वातें उसळलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रुपीं गुंतलीं मानसें । ध्यानीं मुनिजनां ज्याचें पिसें । तेंचि हें सुंदर स्वरुप कैसें । धरिलें भक्त कैवारा ॥१॥ अंगी चंदनाची उटी । तुळशी माळाहार कंठी । बुका शोभला लल्लाटीं । रत्नें मुगुटीं झळकती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रेखिले निढळीं केशरीं टिळक । तयावरी कस्तुरी परम सुरेख । उत्तम कुंकूं जाउळीं देख । लाविलिया आरक्त अक्षता ॥१॥ मग तो चंदन मलयागर । चर्चिला सुवासित अति परिकर । यावरी काढुनी सुमनाहार । उभयतां कंठीं ओपिले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लखलखिलें सुतेज माझिया नयनापुढें । चतुर्भुज रुपडें मेघश्याम ॥१॥ तेणेंचि वेधिलें हदईचि राहिलें । मागें पुढें ठेले वेष्ठुनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लगोरिया मांडूनि पोरा वांटशील गडी । निर्बळाच्या संगे डाव देतां येसी रडी ॥१॥ न करीं ऐसें आतां । करीं गडी श्रीअनंता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लाज वाटे जीव करी तळमळ । चिंते वक्षस्थळ व्यापियेलें ॥१॥ पडिलों निढळ न सुचेचि विचार । तुम्हीं तों निष्ठुर धरियेलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

लाजविली सेवा लाजाविली भक्ति । वैराग्य विरक्ति लाजविली ॥१॥ ऐसाचि घडोनि आला हा प्रसंग । हांसविलें जग आपुल्या ब्रीदा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा