भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

येतां देखोनियां बळिरामें । आकळिला तो अति विक्रमें । म्हणे पापिया तुवां अधर्म । बहुत केली कृष्णनिंदा ॥१॥ तया दोषाचें प्रयश्रिचत । आजी घे पा यथोचित । होई देहापासूनि मुक्त । म्हणोनि टांगेसी धरियेला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येती जाती वर्षती मेघ । गगन तें अभंग जैसें तैसें ॥१॥ तैसींच ब्रम्हांडे अनेक होती जाती । स्वरुप तें अव्दैतीं अव्दैत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येतो जातो ना दिसेपरी । नित्य व्यभिचारी चित्ताचा ॥१॥ ऐसाचि याचा चोरटा खेळ । आहे चक्रचाळ मुळींचाची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येथें तुजलागीं बोलाविलें कोणी । प्रार्थिल्यावांचूनि आलासी कां ॥१॥ प्रल्हादा कैवारी दैत्यांशीं दंडाया । स्तंभीं देवराया प्रगटोनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येरीकडे आनंद गोकुळीं । गोप उठोनि प्रात:काळी । मिळले नंदाच्या राऊळीं । करिती जागे श्रीकृष्ण ॥१॥ दसवंती म्हणे गोकुळांसी । निद्रित आहे हषिकेशी । पुढें जा घेउनी गोधनासी । जाग झालिया येईल ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येरीकडे गोकुळाभीतरी । येतांचि परमात्मा श्रीहरी । विश्वकर्मा येऊनियां निमिशावरी । नगर शृंगारी कौतुके ॥१॥ निजेलीचे असतां नारीकुमरें । शृंगारिलीं वस्त्रे अळंकारें । वृध्द होताती ते निमासुरे । रुंपे मंडित योजिलीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येरे दिवशीं घेउनी सवें । गोवळ खिल्लारांचे थवे यमुनातटाकीं नित्य नवे । खेळ खेळती विचित्र ॥१॥ म्हणे यारे चेंडूफळी । खेळों अवघे मिळोनी बळी । ऐसें बालोनियां वनमाळीं । कास घालित नेटकी ॥२॥ चें

रचनाकार: संत निळोबा

येरें शब्द ते ऐकोन । उभा ठाकला जगज्जीवन । माता म्हणे हे अवगुण । कांरे ऐसे करितोसी ॥१॥ ठायीं वाडिलिया न जेविसी । आणि येथें माती खाशी । येरु म्हणे नाहीं ऐशी । प्रतिज्ञा मी दावीन ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

योगाभ्यास साधताचि सांग । येति उपसर्ग सिध्दींचे ॥१॥ कैंचि तेथें हरीसी भेटी । विवंचना शेवटी काळाचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

योगी चिंतिती चिंतनीं । ध्यानीं मनीं रुप ज्याचें ॥१॥ तो हा अकल्पितचि आला । उभा केला पुंडलिकें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रन्तखचित पालख । सूर्या ऐसा निर्भियेला चोख । निरालंबी गोऊनि देख । मोहें उत्साह मांडियेला ॥१॥ महर्षि ऋषिहि सकळिक । आले पहावया कवतुक । अवलोकूनियां यदुनायक । करिती प्राणें कुरवंडिया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

राजा जाय तिकडे ऐश्वर्य संपत्ती । वैभवें चालती समागमें ॥१॥ वसे वनामाजी तेथें सर्व सिध्दी । घेऊनि समृध्दी वसतीपाशीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

राजा म्हणे रजकहि गाठी । आहेत पांचशे आणिक जेठी । मातंगकुळवई ही उग्रदृष्टी । सोडितां वरी झगटेल ॥१॥ परी तो येथें येईल कैसा । आलिया कदाचित करील वळसा । ऐसें विचारी जंव मानसा । तंव प्रधानहि पातले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा