भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

यावरी कोणे ऐके दिवशी । कृष्णें घेउनी सौंगडियांशी । आला यमुनेचे प्रदेशीं । तंव गाई खिल्लारें देखिलीं ॥१॥ तयामाजी अंति चोखडें । वत्स गाईचे ते पाडे । त्याचि ऐसें धरुनी रुपडें । वत्सासुर तेथ उभा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी गडियांसीं खेळत । आला यमुनेतीरा आंत । क्रीडा करितां करितां आर्त । देखिलें ऐसें यमुनेचें ॥१॥ जैशा येऊनियां गौळणी । कृष्णमुखीं घालिती लोणी । मीच अंतरलें गे पापिणी । होऊनियां पाणी वाहातुसे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी गौळणी सुंदरी । नूऊनियां निजमंदिरीं । खेळविती परमात्मया श्रीहरी । नाना उपचारी पूजिती ॥१॥ देऊनियां चंदनउटी । केशरी टिळक लाविती लल्लाटीं । नाना सुमनहार कंठी । घालिती वरवंटी श्रीकृष्णा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी पुढील कार्यार्थु । साधावया श्रीकृष्णनाथु । चालिले राजभुवना आंतु । तंव दारवंटा समस्त मल्ल उभे ॥१॥ म्हणती कोठें रे करुनियां मेळ । चालिला ते अवघे गोवळ । नेणोनियां राजाज्ञा बळ । जैसे टोळ सैराट ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी बगासुराची कथा । विचित्र आहे ते ऐकतां । कृष्णकरें पावोनि घाता । महामुक्तीतें वरील ॥१॥ मग तो बगरुपीया असुर । ध्यानस्थ यमुनातीरी स्थीर । झांकूनियां उभय नेत्र । एकाचि पायावरी उभा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यावरी म्हणे सवंगडियांसी । वत्सें फांकलीरे चौपासी । वळूनि आणा धांबा त्यासी । मग सावकाशी बैसा सुखें ॥१॥ तंव ते म्हणती हो वनमाळी । आजीचि वळती तुमची पाळी । जाऊनियां तूंचि सांभाळीं । आम्ही निष्काम आजिचेनि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

यासी पाहतां वो हदयस्थ पाहीला । यासि बोलतां वो वेदुचि घोकिला । यासि खेळतां कुसंगदोष गेला । यासि भोगितां हा प्रत्यवायी गळाला वो ॥१॥ ऐसा निजानंद परमात्मा श्रीहरी । आम्हीं लाधलों वो भाग्याच्या संसारी । नित्य आलिंगूं या हदयाच्या अंतरीं । ऐशा निजबोधें निवाल्या सुंदरी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येईल चित्तासी तें करा । तुम्ही आतां विश्वंभरा ॥१॥ आमुचें वायां गेलें जिणें । नांदा तुम्ही देवपणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येईल चित्तासी तें तुम्हां उचित । आपुलें संचित भोगूं आम्ही ॥१॥ काय समर्थासी विनवावें रंकें । कोण त्याचें ऐके वचन तेथें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येऊनि जाऊनि करी गौळणीचे कोड । पुरवूनि सकलही अंतरींची चाड । नेदी प्रेम त्याचें खंडो करी वाड । ऐसा कृपाळू हा सुखाचा सुरवाड वो ॥१॥ धन्यभाग्याचा त्या जन्मल्या संसारी । ज्यांचे ध्यानी मनीं नित्यकाळ हरी । करीतां काम काज दृष्टी यावरी । बोलतां चालतां जेवितां निरंतरीं वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सुदुरुनाथें ॥१॥ हात ठेविला मस्तकीं । देउनी प्रसाद केलें सुखी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येऊनियां गडी वंदिती कान्हया । आळंगितो तया बहुता गानें ॥१॥ चला जाऊं घरां हरीसवें चालती । आनंदें नाचती भोंवताले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येकलें न कंठेचि म्हणोनियां येणें । केलीं निर्माणें वो चौदाही भुवनें । गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणें । पांचही महाभूतें भौतिकें भिन्नें भिन्नें वों ॥१॥ ऐसा लाघविया मायासूत्रधारी । येकला येकटाचि झाला नानाकरी । स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरीं । तो हा नंदनंदन सये बाळब्रम्हचारी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येणे आपुलिया कुपेची गुणें । माझीं पोशिली वो सर्वागजीवनें । देऊनि क्षेम अवघीं निवविली करणें । यासी काय देऊनि व्हावें म्या उत्तीर्ण वो ॥१॥ माझें जीवींचा हा जिवलग सोयरा । यासी करुनि काय पूजावें उपचारा । जें जें कीजे तो तो उपाधी पसारा । कैसेनि पावेल या निज निविकारा वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

येणें एकलें वो जाणेंही शेवटीं येथें राहणेचि नाहीं कल्पकोटी । जोडिलें धन तें न चले लक्ष कोटी । म्हणेनि आलिये या सांवळियाचे भेटी वो ॥१॥ आतां घाला वो याच्या पायांवरी । हाचि चुकवील जन्माचि भोंवरी । शिणलें बहुत वो चौंयांयशींचे फेरीं । तोडिल चिंता हा हेचि आशा थोरी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा