भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

विटिया दांडू मांडिती खेळा । मेळवूनि मेळा संवगडियांचा ॥१॥ सुं म्हणोनियां मारिती टोला । हांसती त्याला डाव घेतां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठोबा विठोबा नामोच्चार गोड । सरे येथें चाड सकळिकांची ॥१॥ गात्य आईकत्या एकचि नव्हाभ्र । वैकुंठ राउळीं वसावया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठ्ठल केणें मागेंपुढें । पिकें उघडें सुरवाडिक ॥१॥ एक ते घेती देती एक । तरि हें अधिक् भरलेंसे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठ्ठल नामें वाहे टाळी । बहमानंदाच्या कल्लोळीं ॥१॥ निजात्मसुखाचा सोहभ । विठ्ठल अवलोकिती डोळां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठ्ठल नामें विठ्ठल झाले । देहभावा विसरुनि गेले ॥१॥ सर्व काळ विठ्ठल चित्तीं । बहमानंदें ते डुल्लती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठ्ठल नाहीं ज्या ठाउका । परमार्थचि त्याचा लटिका ॥१॥ करितो तें पोटासाठीं । बाष्कळ अवघीच चावटी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठ्ठल मूर्ति पाहतां दिठीं । पळती कोटी पापांच्या ॥१॥ मग तो आविर्भवे अंतरीं । दिसे बाहेरी चहूंकडे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठ्ठल विठ्ठल म्हणतां वाचे । स्वरुप त्याचें आठवे ॥१॥ शामसुंदर कटीं कर । रुप मनोहर तेजस्वी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विठ्ठल विठ्ठल म्हणोनी छंदें । ब्रम्हानंदें नाचेन ॥१॥ धरुनियां दृष्टीपुढें । रुप चोखडें सुरेख ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विदयामानें गर्वताठा । धरुनि प्रतिष्ठा वाढविती ॥१॥ नेणती जेणें देव हातीं । लागे ते युक्ति हारविली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विश्व अवघें मायाभास । माया ब्रहमीं नाहींची मोस ॥१॥ जेविं वन्हि सूर्यकांतीं । प्रगटतां कीर्ण त्या नेणति ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विश्वास अंतरींचा जाणोनी । नाम ठेवा माझया वदनीं । रुप मनाचे आसनीं । कृपा करुनी बैसवा ॥१॥ रुप मनाचे आसनीं । कृपा करुनी बैसवा ॥१॥ करीन तैसी घ्यावी सेवा । विश्वास पालटों न दयावा ॥ आईका विनविलें तें देवा । अहो पंढरीनिवासा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा