भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

वसुदेव देवकीचिये उदरी । कृष्ण जन्मले मथुरेभितरीं । कंसाचिये बंदिशाळे माझारी । श्रावण कृष्णाष्टमीं मध्यरात्री ॥१॥ अयोनिसंभव चतुर्भज । शंक चक्र गदांबुज । चहूं करी आयुधें सुतेज । मुगुट कुंडलें वनमाळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वस्तुचा जो स्वाभावगुण । वोसंडूं नेणे तो आपणा ॥१॥ तेविं हा परमात्मा श्रीहरी । सांडूं नेणें आपुली थोरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वाचा नामसंकीर्तनीं । मानस तुमच्या निश्चयें ध्यानी । नेत्र हे तुमच्या अवलोकनीं । चालावें चरणीं तीर्थयात्रे ॥१॥ करीं करावें तुमचें पूजन । श्रवणीं करावें गुणांचे श्रवण । चित्तें सदां तुमचें चिंतन । घ्राणी अवघ्राण निर्माल्य तुळसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वाचा वेधलां हरिकीर्तनीं । श्रवण श्रवणीं गोडावले ॥१॥ नेत्रीं बैसलें हरीचें रुप । पूजनीं पडप उभय करां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वाचेतें वदवी रसनेतें चाखती । नेत्रातें दाखवी परि त्या दुरी ॥१॥ बुध्दी बोधविता चित्ता चेतविता । देहीं देहातीता कैसेनि दावूं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वांटुनियां गडी चेंडु मांडियेली फळी । मेलासी धांवतां कान्हो नाटोपेचि बळी ॥१॥ येईल चेंडू हातारे । हरिसी शरण जातां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वाढी कवळ श्रीहरी हातें । आड वैष्णवातें करुनियां ॥१॥ म्हणोनियां अभिमान सांडा । घ्या हो तोंडा भरुनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वांयां संतांची ही बोली । वचनें त्यांचीं लाजविलीं ॥१॥ लटिकाचि केला कीर्तिघोष । येथें तो अवघीच निरास ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वारकरी संत पंढरीसी जाती । सप्रेमें नामघोषें ॥१॥ लोटांगणी त्यांसी जाईन आवडी । ओवांळीन कुडी वरुनी पायां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वाळिलें जे पंढरिनाथें । त्याचें कोण कार्य येथें ॥१॥ घाला आपणा बाहेरीं । नका सांगों त्याची थोरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विटि दांडू भला रे तरीच मारीं टोला । नाहीं तरि डाव घेतां धांवडिती मुला ॥१॥ सावधान पाहे रे हरीचि चित्तीं ध्याये । न राहोनि निदसुरा खेळाच्या प्रवाहें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा