भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

योगी शिणताती साधनकपाटीं । तया नोहे भेटीं कांही केल्या ॥१॥ तो हरी गोकुळीं बाळवेषे खेळे । पुरती सकळ मनोरथ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

योगीयांचे चिंतनी न बैसे । यज्ञ यागादिकांसीं जो न गिवसे । तो भाविकांचें कीर्तनासरिसें । नाचतसें आनंदें ॥१॥ तो भाविकांचे कीर्तनीं आपुलें । सुख अनुभवी वहिलें । प्रेमें ब्रह्मानंदी डोले । वैष्णावांचें सदनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

योग्याचे ध्यान बैसलेंसे मौन । तो हा निधान विटेवरी ॥१॥ विठ्ठल सांवळा पाहुं चला डोळां । धरुनी बाळलीला कटीं कर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रकारासी कान्हा मकारपुढती । स्मरतां होय मुक्ति सर्व जनां ॥१॥ नारी अथवा नर हो कां दुराचारी । वाचे म्हणतीं हरी सर्व मुक्त ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रखितो गोध्नेआं मनाचेनी मनें । न पुरे अवसरु धावण्यां धावणें । कुंठित जाहली गति पवनाची तेणें । तो हा नंदाचा नंदन यशोदेचें तान्हें ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

रडती रांडापोरें नाशिवंतासाठीं । केवढी आटाआटी जीवीं होसी ॥१॥ कुडीसी मरण न कळेचि जाण । आत्मा अविनाश परिपूर्ण स्वयंज्योती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रतीच्या अंती जें होय सुख । सर्वांगीं तें सर्वदा देख ॥१॥ इंद्रियाविण आहे गोडी । तेथींचा स्वादु कवण काढी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रसने रसभोग्य रसाचा भोक्ता रस ग्रासी होय भेटी । रसस्वादाचा सौरसु तोची ब्रह्मारसो कृष्णीं पडतसे गांठीं ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

रसातळां जातां अवनी । घेतलें वराहरुप चक्रपाणी ॥१॥ तोचि महाराज पुंडलिकासाठीं । कर ठेऊनी कटीं उभा विटे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राखीत गोधनें भक्ताचियां काजा । उणीव सहजा येवो नेदी ॥१॥ आपुलें थोरपणा सारुनी परतें । भक्तांचे आरुतें काम करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ