भजनी मालिका
← भजनांकडे परत

रसातळां जातां अवनी । घेतलें वराहरुप चक्रपाणी

rasatalan jatan avani | ghetalen varaharup chakrapani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रसातळां जातां अवनी । घेतलें वराहरुप चक्रपाणी ॥१॥ तोचि महाराज पुंडलिकासाठीं । कर ठेऊनी कटीं उभा विटे ॥२॥ हिरण्याक्ष वधुनी सुखी केले देव । एका जनार्दनी त्याचे पायीं ठाव ॥३॥