भजनी मालिका
← भजनांकडे परत

राखीत गोधनें भक्ताचियां काजा । उणीव सहजा येवो नेदी

rakhit godhanen bhaktachiyan kaja | univ sahaja yevo nedi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राखीत गोधनें भक्ताचियां काजा । उणीव सहजा येवो नेदी ॥१॥ आपुलें थोरपणा सारुनी परतें । भक्तांचे आरुतें काम करी ॥२॥ उच्छिष्ट काढणें सारथ्य करणें । उच्छिष्टं तें खाणें तयांसवें ॥३॥ चुकतां वळती आपण वोळणें । एका जनार्दनीं पुण्य धन्य त्यांचें ॥४॥