भजनी मालिका
← भजनांकडे परत

रडती पोटासाठीं । झालों म्हणती संन्यासी

radati potasathin | jhalon mhanati sannyasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रडती पोटासाठीं । झालों म्हणती संन्यासी ॥१॥ वर्म न कळेची मुढां । होतो फजित रोकडा ॥२॥ जनीं नारायणा । अवघा भरला जनार्दन ॥३॥ तडातोडी करूनी वर्म । चुकला तो अधम ॥४॥ सर्वांठायीं नारायण । एका जनार्दनीं भजन ॥५॥