भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगी शिणताती साधनकपाटीं । तया नोहे भेटीं कांही केल्या

yogi shinatati sadhanakapatin | taya nohe bhetin kanhi kelya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
योगी शिणताती साधनकपाटीं । तया नोहे भेटीं कांही केल्या ॥१॥ तो हरी गोकुळीं बाळवेषे खेळे । पुरती सकळ मनोरथ ॥२॥ गोपिका तयासी कडेवरी घेती । वालादुला म्हणती माझे माझें ॥३॥ एका जनार्दनीं जया जैसा हेत । तैसा पुरवीत देवराव ॥४॥