भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजाई येऊनियां घरीं । नमस्कार करी नामदेवा

rajai yeuniyan gharin | namaskar kari namadeva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राजाई येऊनियां घरीं । नमस्कार करी नामदेवा ॥१॥ परीस देणें झडकरी । परिसा उभा असे द्वारीं ॥२॥ ऐकतांचि ऐसी मात । आलें भीमेसी धांवत ॥३॥ पुंडलीकासी नमस्कार । केला जयजयकार नामघोष ॥४॥ एका जनार्दनीं स्नान । नामा करितसे जाण ॥५॥