भजनी मालिका
← भजनांकडे परत

रंक बैसतां पालखीसी । उपेक्षी पहिल्या पदवीसी

rank baisatan palakhisi | upekshi pahilya padavisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रंक बैसतां पालखीसी । उपेक्षी पहिल्या पदवीसी ॥१॥ तैसें नाम मुखी गातां । कोण ब्रह्मा ज्ञान वार्ता ॥२॥ मूळीचे जाहले नाहीं खंडन । वादविवाद अभेदी जाण ॥३॥ एका जनार्दनी शरण । ब्रह्माज्ञानाची कोण आठवण ॥४॥