भजनी मालिका
← भजनांकडे परत

योग्याचे ध्यान बैसलेंसे मौन । तो हा निधान विटेवरी

yogyache dhyan baisalense maun | to ha nidhan vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
योग्याचे ध्यान बैसलेंसे मौन । तो हा निधान विटेवरी ॥१॥ विठ्ठल सांवळा पाहुं चला डोळां । धरुनी बाळलीला कटीं कर ॥२॥ संतांचा समुदाव आरत्यांची दाटी । नामघोष सृष्टी न समाय ॥३॥ आषाढी कार्तिक आनंद सोहळा । येती नरनारी बाळा पाहवया ॥४॥ एका जनार्दनीं पुरला मनोरथ । विठ्ठल पाहतां चित्त गुंतलेसे ॥५॥