भजनी मालिका
← भजनांकडे परत

रस सेविल्यासाठीं । भोगवी जन्माचिया कोटी

ras sevilyasathin | bhogavi janmachiya koti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रस सेविल्यासाठीं । भोगवी जन्माचिया कोटी ॥१॥ रसने आधीन सर्वथा । रसनाद्वारें रसु घेतां ॥२॥ जंव रसना जिंतिली । तंव वाउगीच बोली ॥३॥ एका जनार्दनीं शरण । रस रसना जनार्दन ॥४॥