भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

माझे मज कळलें माझें मज कळलें । नाहीं परतें केलें आपणातुनीं ॥१॥ उदकीं लवण पडतां न निघे बाहेरीं । तैशी केली परी जनार्दनें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माझे मनोरथ चरणाची आवडी । दुजियाची जोडी नको आतां ॥१॥ वाउगा पसारा नका गोऊं मन । चरणाशी जाण स्थिर होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माझें माझें म्हणोनि करितोसी कष्ट । उडाला तो हंस राहिलें फलकट ॥१॥ तनांचें बुजवणें तैशी देहस्थिती । चित्ता अग्नि उजळोनि मिळे मातीसी माती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माझें मीपण देहीच मुरालें । प्रत्यक्ष देखिलें परब्रह्मा ॥१॥ परब्रह्मा सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळां भरूनियां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माझ्या मना तूं करीं पां विचार । नाम निरंतर निवृत्ति जपें ॥१॥ जपतां नामावळी आळस न करीं । कोटि जन्म फ़ेरी चुके तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ