भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे माहेर पंढरी । आहे भीवरेचे तीरीं

majhe maher pandhari | ahe bhivareche tirin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझे माहेर पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥१॥ बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥ पुंडलिक बंधु आहे । त्यांची ख्याती सांगु काय ॥३॥ माझी बहिण चंद्रभगा । करितसे पापभंगा ॥४॥ एका जनर्दनी शरण । करी माहेरीची आठवण ॥५॥