भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे मनोरथ चरणाची आवडी । दुजियाची जोडी नको आतां

majhe manorath charanachi avadi | dujiyachi jodi nako atan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझे मनोरथ चरणाची आवडी । दुजियाची जोडी नको आतां ॥१॥ वाउगा पसारा नका गोऊं मन । चरणाशी जाण स्थिर होय ॥२॥ एका जनार्दनीं पुरवी वासना । दुजें नारायणा नको कांहीं ॥३॥