भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या देहाचें देहपण । नागविता नारायण

majhya dehachen dehapan | nagavita narayan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझ्या देहाचें देहपण । नागविता नारायण ॥१॥ माझें मीपणा पाडिलें वोस । वायां कां मज ठेविला दोष ॥२॥ जेथें; मीपण जाले वाव । तेथें करतेपणाचा ठाव ॥३॥ एका जनार्दनीं अभिमान । सांडोनियां झाला लीन ॥४॥