भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या मना धरीं गोडी । संत जोडी करी तूं

majhya mana dharin godi | sant jodi kari tun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझ्या मना धरीं गोडी । संत जोडी करी तूं ॥१॥ मग सुखा काय उणें । देवचि ठाणें दुणावें ॥२॥ कळिकाळ वंदी माथां । नाहीं चिंता संसार ॥३॥ एका जनार्दनीं दास । हेंचि आस पुरवावी ॥४॥