भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या मना तूं करीं पां विचार । नाम निरंतर निवृत्ति जपें

majhya mana tun karin pan vichar | nam nirantar nivrutti japen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझ्या मना तूं करीं पां विचार । नाम निरंतर निवृत्ति जपें ॥१॥ जपतां नामावळी आळस न करीं । कोटि जन्म फ़ेरी चुके तेणें ॥२॥ सुखरुप तूं होसील साचार । गर्भाचा उदगार खुंटे साचा ॥३॥ एका जनार्दनीं सांगे निर्धार । निवृत्ति उच्चार नाम करी ॥४॥