भजनी मालिका
संत चोखोबा

संत चोखोबा

या संतांची भजने

देवा कां हें साकडें घातिलें । निवारा हें कोडें माझें तुम्ही ॥१॥ समर्थे आपुल्या नामासी पाहावें । मनीं उमजावें आपुलिया ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

देवा नाहीं रुप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठायी ॥१॥ डोळियाचा डोळा दृष्‍टीच भासला । देव प्रकाशला आदि अंतीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

देवा नाहीं रूप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठाई ॥१॥ निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण । दोहींचें कारण तेच ठाई ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

देह बुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥ देव पहा तुम्हीं देव पहा । तुम्हीं देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥ कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया । कांहो न ये दया माझी तुम्हां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

धरोनी विश्वास राहिलेसें द्वारीं । नाम श्रीहरी आठवीत ॥१॥ कळेल तैसें करा जी दातारा । तारा अथवा मारा पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

धांव घाली विठु आतां चालुं नको मंद । मज मारिती बडवे कांहीतरी अपराध ॥१॥ विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला । शिव्या देऊनी मारा म्हणती देव कां बाटला ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

धिक् तो आचार धिक् तो विचार । धिक् तो संसार धिक् जन्म ॥१॥ धिक् तें पठण धिक् तें पुराण । धिक् यज्ञ हवन केलें तेणें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

न करी आळस जाय पंढरीसी । अवघी सुखराशि तेथें आहे ॥१॥ पहातां भिंवरा करी एक स्नान । घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नवल पाहीं नवल पाहीं । पाहों जावें तेणें पाहिलें नाहीं ॥१॥ निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण । दोहींचें कारण तेंच ठाईं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नाम हें सोपें जपतां विठ्ठल । अवघेंचि फळ हातां लागे ॥१॥ योग याग जप तप अनुष्ठान । तीर्थ व्रत दान नाम जपतां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नामाचें सामर्थ्य विष तें अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥ तें नाम सोपें विठ्ठल विठ्ठल । नको काळ वेळ जपें आधीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नाशिवंतासाठीं करितोसी आटी । दृढ धरा कंठीं एक नाम ॥१॥ भवासी तारक विठ्ठलची एक । नाहीं आणिक सुख येतां जातां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नाहीं देह शुद्ध याति अमंगळ । अवघे वोंगळ गुण दोष ॥१॥ करूं जातां विचार अवघा अनाचार । आणिक प्रकार काय बोलूं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

निगमाचे शाखे आगमाचें फळ । वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥ पुराणासी वाड योगियांचें गुज । सकळां निजबीज विठ्ठल हा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

निर्गुणा अंगी सगुण बाणलें । निर्गुण सगुण एकत्वा आलें ॥१॥ शब्दाची खूण जाणती ज्ञानी । येरा गबाळा अवघी कहाणी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा