भजनी मालिका
संत चोखोबा

संत चोखोबा

या संतांची भजने

आम्ही कोणावरी सत्ता । करावी बा पंढरीनाथा । होईल साहाता दुजा । तत्त्वता तो सांगा ॥१॥ तूंचि बळिया शिरोमणि । आहेसि या त्रिभुवनीं । देवाधिदेव मुगुटमणि । कींव भाकणें यासाठीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

इतुकेंचि देई रामनान मुखीं । संतांची संगती सेवा सार ॥१॥ निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरी सुखे मज ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

उतरले सुख चंद्रभागे तटीं । पाहा वाळुवंटी बाळरूप ॥१॥ बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचे सुख ब्रम्हा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

उदंड नागवले वाहावले पुरीं । ऐसी याची थोरी काय सांगों ॥१॥ ब्रम्हादिक जेणें बहु नागविले । सिद्ध ऋषि भुलविले येणें देख ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

उपजले विटळीं मेले ते विटाळीं । राहिले विटाळीं ते ही जाती ॥१॥ रडती पडती ते ही वेगें मरती । परि नाम न गाती भुली भ्रमें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

ऊंस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय बुललासी वरलीया रंगा ॥१॥ कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥१॥ विधीतें वाळिलें निषेधा गिळिलें । सर्व हारपले जेथिंचें तेथें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कळेल तैसे बोल तुजचि बोलेन । भीड मी न धरीन तुझी कांहीं ॥१॥ काय करूं देवा दाटलों जाचणी । न या चक्रपाणी सोडवण्या ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कवणावरी आतां देऊं हें दूषण । माझें मज भूषण गोड लागे ॥१॥ गुंतलासे मीन विषयाचें गळीं । तैसा तळमळी जीव माझा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कशासाठीं तुम्हां शरण रिघावें । आमुचें वारावें सुख दु:ख ॥१॥ आमुचें संचित भोग क्रियामान । तुमचें कारण तुम्हीं जाणा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

काय हें दु:ख किती ह्या यातना । सोडवी नारायणा यांतोनियां ॥१॥ जन्मावें मरावें हेंचि भरोवरी । चौर्‍यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

काय हें मातेसी बाळें शिकवावें । आपुल्या स्वभावें वोढतसे ॥१॥ तैसाच प्रकार तुमचीये घरीं । ऐसीच निर्धारी आली वाट ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

काळाचा विटाळ जीवशिवा अंगीं । बांधलासे जगीं दृढ गांठीं ॥१॥ विटाळी विटाळ चवदाही भुवनीं । स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कांहीं तरी अभय न मिळे उत्तर । ऐसे कां निष्ठुर झालां तुम्ही ॥१॥ मी तों कळवळोनी मारितसे हांक । तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कांहो केशिराजा दूजे पैं धरितां । हें तों आश्रर्यता वाटे मज ॥१॥ एकासी आसन एकासी वसन । एक तेचि नग्न फिरताती ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा