भजनी मालिका
← भजनांकडे परत

न करीं सायासाचें काम । गाईन नाम आवडीं

na karin sayasachen kam | gain nam avadin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
न करीं सायासाचें काम । गाईन नाम आवडीं ॥१॥ या परतें कांही नेणें । आन साधनें कोणतीं ॥२॥ सुखाचेंचि अवघें झालें । नाहीं उरलें दु:खातें ॥३॥ चोखा म्हणे भवनदी उतार । नामें पैलपार तरेन ॥४॥