भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे

dharoniya asha takilase thav | avaghachi vav jhala dise

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥ कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया । कांहो न ये दया माझी तुम्हां ॥२॥ बाळकाचे परी लडिवाळपणें । तुमचें पोसणें मी तों देवा ॥३॥ चोखा म्हणे मज तुम्ही मोकलितां । काय आमुची कथा आतां चाले ॥४॥