भजनी मालिका
← भजनांकडे परत

देही देखिली पंढरी । विठू अविनाश विटेवरी

dehi dekhili pandhari | vithu avinash vitevari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
देही देखिली पंढरी । विठू अविनाश विटेवरी ॥१॥ रुक्मिणी अंगना । आत्मा पुंडलिक जाणा ॥२॥ आकार तितुका नासे । निराकार विठ्ठल दिसे ॥३॥ ऐसें गुज ठायीचा ठायी । चोखा म्हणे लागा पायी ॥४॥