भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं देह शुद्ध याति अमंगळ । अवघे वोंगळ गुण दोष

nahin deh shuddha yati amangal | avaghe vongal gun dosh

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
नाहीं देह शुद्ध याति अमंगळ । अवघे वोंगळ गुण दोष ॥१॥ करूं जातां विचार अवघा अनाचार । आणिक प्रकार काय बोलूं ॥२॥ वाणी नाहीं शुद्ध धड न ये वचन । धि:कारिती जन सर्व मज ॥३॥ अंगसंग कोणी जवळ न बैसे । चोखा म्हणे ऐसे जीवित माझें ॥४॥