भजनी मालिका
← भजनांकडे परत

धीर माझे मना । नाहीं नाहीं नारायण

dhir majhe mana | nahin nahin narayan

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
धीर माझे मना । नाहीं नाहीं नारायण ॥१॥ बहुचि जाचलों संसारें । झालों दु:खाचे पाझरे ॥२॥ भोग भोगणें हें सुख । परि शेवटीं आहे दु:ख ॥३॥ भारवाही झालों । वाउग्या छंदा नागवलों ॥४॥ दया करा पंढरीराया । चोखा लागतसे पायां ॥५॥