भजनी मालिका
← भजनांकडे परत

निगमाचे शाखे आगमाचें फळ । वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा

nigamache shakhe agamachen phal | ved shastra bol viththal ha

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
निगमाचे शाखे आगमाचें फळ । वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥ पुराणासी वाड योगियांचें गुज । सकळां निजबीज विठ्ठल हा ॥२॥ निगम कल्पतरू भक्तांचा मांदुस । तोही स्वयंप्रकाश विठ्ठल हा ॥३॥ चोखा म्हणे तो तूं जगाचें जीवन । संतांचें मनरंजन विठ्ठल हा ॥४॥